सुशिक्षित माणूस सुसंस्कारित असेलच असं नाही.
पदवीचा उपयोग दरवाज्यावरच्या नावाच्या पाटीवर,
बारीक अक्षरात लिहिण्यापुरताच.
तो दरवाजा बंद केला की ती पदवी बाहेरच राहते.
चार भिंतीत ज्यांना सुसंवाद साधता येतो, आनंदाचे मळे पिकवता येतात
ती माणसं ह्या जगात येतानाच त्या पदव्या घेवून येतात.
त्या विद्यापीठांना नावं नसतात.
पदव्या मिळवण्यासाठी त्या विद्यापीठात कसलेही प्रबंध सादर करावे लागत नाहीत.
तिथे बुद्धीची झटापट करावी लागत नाही.
मज्जातंतू शिणवण्याची गरज नसते.
त्या विद्यापीठांतून फक्त ''देढ हात कलेजा'' आणायचा असतो...!
................व पु काळे...